Sat, Sept 23, 2023

नाणे गावात नळपाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन
नाणे गावात नळपाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन
Published on : 14 May 2023, 9:20 am
टाकवे बुद्रूक, ता. १४ : आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यातून नाणे गावातील नळ पाणी पुरवठा योजनेला तब्बल २ कोटी ८४ लाखांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून होणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहळा गुरुवार (ता.११) झाला. मागील काही वर्षांपासून मावळ तालुक्यातील अनेक गावात जल जीवन मिशन योजनेद्वारे नळ पाणी पुरवठा योजना राबवल्या जात आहेत. यातून घरोघरी जलगंगा येत असल्याने महिला भगिनींची पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे. मावळ तालुक्यातील नाणे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या हस्ते झाला. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत तब्बल २ कोटी ८४ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. यावेळी आजीमाजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.