
सोमाटणे टोलनाक्याविरोधात वडगाव न्यायालयात याचिका
तळेगाव स्टेशन, ता. ४ : पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाक्याविरोधात तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे, सुनील पवार आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी टोल कंत्राटदार आयआरबीसह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाविरोधात वडगाव मावळ न्यायालयात सीआरपीसी ३९ अंतर्गत याचिका दाखल केली आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर वाहनधारकांची वर्षानुवर्षे लूट सुरू आहे. मात्र, यात मोठमोठ्या नेत्यांचे व अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने या विरोधात कोणतेही कारवाई आजतागायत झालेली दिसून आली नाही. अनेकवेळा संघटना पक्षांनी आंदोलने केली. मात्र, उपयोग काहीच नाही. पुणे ते मुंबई टोल नाक्यावर वाहनधारकांची वर्षानुवर्षे लूट सुरू आहे. मात्र, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी तक्रारीवर कोणतीही कारवाई करीत नाही. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीत पुणे-मुंबई महामार्गावरील टोल नाका देहूरोडला दाखविण्यात आला असून, तो वास्तविक सोमाटणे म्हणजेच तळेगाव दाभाडे हद्दीत आहे. दोन टोलनाक्यांमधील अंतर हे ६० किलोमीटर असावे, असा नियम असतानाही या नियमाकडे रीतसर दुर्लक्ष करून नाहक टोलवसूल केला जात आहे. तळेगाव दाभाडे, वडगाव, लोणावळा येथील रहिवासी, व्यापारी यांना नियमित वाहतुकीसाठी आम्हाला दुसरा मार्ग नसून, सोमाटणे नाक्यावरील टोल भरूनच त्यांना पुण्याला जावे लागते. नियमानुसार स्थानिक वाहतुकीस २५ टक्के टोल घ्यावा व स्थानिक वाणिज्य वाहतुकीस ५० टक्के टोल घ्यावा, हे स्पष्ट असतानाही सोमाटणे टोलनाक्यावर १०० टक्के टोलवसूल केला जात आहे. त्यामुळे स्थानिक वाहनधारकांना आर्थिक तोटा होत असून, टोल कंत्राटदारास बेकायदा लाभ होत आहे. या बाबत वस्तुस्थिती तपासून तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे, सुनील पवार आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी वडगाव मावळ न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सोमाटणे टोल नाका
Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02810 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..