नागफणी कड्यावर राऊत बंधूंची महाराष्ट्रदिनी मानवंदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागफणी कड्यावर राऊत बंधूंची महाराष्ट्रदिनी मानवंदना
नागफणी कड्यावर राऊत बंधूंची महाराष्ट्रदिनी मानवंदना

नागफणी कड्यावर राऊत बंधूंची महाराष्ट्रदिनी मानवंदना

sakal_logo
By

नागफणी कड्यावर
साहसी मानवंदना

तळेगाव स्टेशन, ता. ५ : येथील गिर्यारोहक राऊत बंधूनी साडेतीनशे फूट उंचीचा नागफणी कडा सर करून साहसी मानवंदना दिली.
लोणावळा लगतच्या कुरवंडेजवळ असलेल्या घनदाट जंगलातील खड्या कातळ खडकाचा, चढाईला अतिशय दुर्गम व कठीण असा ड्यूक नोज ऊर्फ नागफणी कडा पुरुषोत्तम राऊत आणि प्रशांत राऊत या बंधूनी टीम पॉइंट ब्रेक अॅडव्हेन्चरच्या मदतीने यशस्वीपणे सर केला. गिर्यारोहक राऊत बंधू यांनी आतापर्यंत बरेच कठीण असे सह्याद्रीतील सुळके सर केले आहेत. तळपत्या उन्हात इच्छाशक्ती तसेच निश्चयी मानसिकता तसेच पराकोटीची सहनशीलता दाखवत राऊत बंधूनी महाराष्ट्र दिन अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. टीम पॉइंट ब्रेक एडव्हेंचरचे जॉकी साळुंखे, चेतन शिंदे तसेच डॉ. समीर भिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन राऊत यांना लाभले. युवकांनी गड किल्ले सर करावेत तसेच पर्वतरोहन करावे. राज्यात असलेल्या निसर्ग सौंदर्याचा भरपूर आनंद घ्यावा, असा मोलाचा संदेश यानिमित्ताने बंधूनी युवकांना दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02813 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top