तळेगाव नगरपरिषद प्रारुप प्रभागरचना कार्यक्रम जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव नगरपरिषद प्रारुप प्रभागरचना कार्यक्रम जाहीर
तळेगाव नगरपरिषद प्रारुप प्रभागरचना कार्यक्रम जाहीर

तळेगाव नगरपरिषद प्रारुप प्रभागरचना कार्यक्रम जाहीर

sakal_logo
By

तळेगाव नगरपरिषद प्रारुप प्रभागरचना कार्यक्रम जाहीर

तळेगाव स्टेशन, ता. १० : सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने ‘ब’ वर्ग नगरपरिषदांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूकांची कार्यवाही त्वरीत सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यास अनुसरुन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकतींपासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने सुधारीत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
१० ते १४ मे दरम्यानच्या कालावधीत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रारुप प्रभागरचनेबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्रभाग रचनेबाबत प्राप्त झालेल्या हरकती आणि सुचनांवर २३ मेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून सुनावणी होणार आहे. प्राप्त हरकती व सूचनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ३० मे पर्यंत अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर सहा जूनला राज्य निवडणुक आयुक्त अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील. येत्या सात जूनला प्रभाग निहाय एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या आदींचा उल्लेख असलेली अंतिम प्रभाग रचनेबाबतची अधिसुचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपरीषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहीती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02822 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top