
तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयाचे स्थलांतर
तळेगाव स्टेशन, ता. १३ : नवीन प्रशासकीय कार्यालयाच्या कामासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयाचे स्थलांतर तात्पुरत्या स्वरूपात मारुती मंदिर चौकालगतच्या कै. पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा संकुल येथे केले आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सद्यःस्थितीत सुरू असलेले दैनंदिन प्रशासकीय कामकाज हे नगरपरिषद मालकीच्या सि. स. क्र. ४७५१ येथील जुन्या इमारतीमध्ये ऑक्टोबर १९७६ पासून सुरू आहे. सध्याची जुनी प्रशासकीय इमारत जीर्ण झालेली आहे. त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याबाबत धोरणात्मक निर्णय, जुनी प्रशासकीय इमारत पाडण्यासाठी व नगरपरिषदेच्या कै. पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा संकुल याठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत मान्यता नगरपरिषद सर्वसाधारण ठराव क्र ९/२ दि. १४ आक्टोबर २०२१ व २२ एप्रिल २०२२ च्या ठराव क्र. १ अन्वये मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यानुसार तळेगाव नगरपरिषदेचे सर्व दस्तऐवज, फाईल्स, रेकॉर्ड रुममधील नस्ती, अभिलेख व इतर आनुषंगिक साहित्य हे ९ मे २०२२ पासून कै. पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा संकुल याठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे मंगळवार (ता.१७) मे पासून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज हे कै. पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा संकुल, मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे याठिकाणावरून सुरू राहील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02827 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..