
तळेगाव नगरपरिषद प्रभागवार आरक्षण जाहीर
तळेगाव स्टेशन, ता. १३ : तळेगाव दाभाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने १४ प्रभागातील २८ जागांसाठीचे आरक्षण, सोडत काढून सोमवारी (ता. १३) सकाळी जाहीर करण्यात आले.
श्रीमंत सरसेनापती अजितसिंहराजे दाभाडे (सरकार) व्यापारी संकुलात सकाळी अकरा वाजता उपजिल्हाधिकारी अजय पवार,तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्यधिकारी विजयकुमार सरनाईक,उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांच्या उपस्थितीत अनुसूचित जाती,जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांच्या आरक्षण निश्चितीकरता सोडतीचे आयोजन करण्यात आले होते.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वीर जिजामाता प्राथमिक शाळा क्रमांक-५ मधील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी रजनी जितेंद्र बासूदकर आणि श्वेता अजय कांबळे यांच्या हस्ते चिट्ठया काढून आरक्षण सोडत काढण्यात आली.प्रभाग क्रमांक १० आणि ०३ साठी चिठ्ठ्या टाकून सोडत काढण्यात आली.त्यानुसार प्रभाग क्रमांक १० अ अनुसूचित जाती सर्वसाधारण तर प्रभाग क्रमांक ३ अ अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे.प्रभाग क्रमांक ४ अ अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे.
२८ जागांसाठी १४ प्रभागांचे गटनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे ः
प्रभाग क्रमांक ०१ : अ : सर्वसाधारण महिला
ब : सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०२ : अ : सर्वसाधारण महिला
ब : सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०३ : अ : अनुसूचित जाती महिला
ब : सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०४ : अ : अनुसूचित जमाती महिला
ब : सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०५ : अ : सर्वसाधारण महिला
ब : सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०६ : अ : सर्वसाधारण महिला
ब : सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०७ : अ : सर्वसाधारण महिला
ब : सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०८ : अ : सर्वसाधारण महिला
ब : सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ०९ : अ : सर्वसाधारण महिला
ब : सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १० : अ : अनुसूचित जाती
ब : सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ११ : अ : सर्वसाधारण महिला
ब : सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२ : अ : सर्वसाधारण महिला
ब : सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १३ : अ : सर्वसाधारण महिला
ब : सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १४ : अ : सर्वसाधारण महिला
ब : सर्वसाधारण
- चौदा प्रभागातील एकूण २८ पैकी १३ जागा सर्वसाधारण आहेत. एक जागा अनुसूचित जमाती महिला, एक जागा अनुसूचित जाती महिला तर एक जागा अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी आरक्षित आहे. उर्वरित १२ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहेत.
- गेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षणाच्या तुलनेत यावेळी मोठा बदल न झाल्याने उपस्थित सर्व इच्छुकांमध्ये आलबेल जाणवली.
तळेगाव दाभाडे : शालेय मुलींच्या हस्ते चिट्ठयांद्वारे नगरपरिषद प्रभागांची आरक्षण सोडत काढताना उपजिल्हाधिकारी अजय पवार, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक,उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे आदी.
Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02862 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..