तळेगावात पाच हजार विद्यार्थ्यांची प्रभातफेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात पाच हजार विद्यार्थ्यांची प्रभातफेरी
तळेगावात पाच हजार विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

तळेगावात पाच हजार विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. ३ : अमृत महोत्सवानिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाकडून सोमवारी (ता. ८) पाच हजार विद्यार्थ्यांची भव्य प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे व देशाचा देदीप्यमान इतिहास नागरिकांच्या मनात तेवत राहावा, या उद्देशाने केंद्र सरकारमार्फत संपूर्ण देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. तळेगाव नगर परिषदेतर्फे देखील या अभियानाचे जोरदार नियोजन चालू आहे. अभियानाबद्दल जनजागृती होऊन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्राभिमान रुजावा या हेतूने तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून सर्व शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.
हातात तिरंगा झेंडा, देशभक्तिपर घोषणा आणि गीतांच्या गजरात भारतमातेचा जयघोष तळेगावात दुमदुमणार आहे. या प्रभात फेरीत तळेगाव नगर परिषदेसह इतर खासगी शाळांचे मिळून अंदाजे पाच हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होतील, असे व्यापक नियोजन चालू आहे. नियोजनासाठी शुक्रवारी (ता. ५) रोजी सायंकाळी साडेचार वाजता नगरपरिषद कार्यालयात सर्व शालेय मुख्याध्यापकांची नियोजन बैठक घेऊन यासंदर्भात सूचना देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले.
तळेगावात विविध ठिकाणी नगर परिषदेतर्फे खासगी व्यावसायिकांच्या मदतीने तिरंगा झेंडा विक्री केंद्र उभारण्यात येणार आहेत. नगर परिषद कार्यालयाबाहेर देखील अधिकृत स्टॉल लावण्यात येणार आहे. तळेगाव नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना बाराशे झेंड्याचे मोफत वाटप करण्यात येईल. सर्व व्यावसायिक, संस्था, संघटना आणि नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावून अभियानामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्याधिकारी सरनाईक यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02904 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..