स्वातंत्र्यसमर महानाट्याचे तळेगावात पोस्टर अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यसमर महानाट्याचे 
तळेगावात पोस्टर अनावरण
स्वातंत्र्यसमर महानाट्याचे तळेगावात पोस्टर अनावरण

स्वातंत्र्यसमर महानाट्याचे तळेगावात पोस्टर अनावरण

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. २३ : सरसेनापती उमाबाई दाभाडे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अॅड. विनय चंद्रकांत दाभाडे निर्मित ‘स्वातंत्र्यसमर’ महानाट्याचे पोस्टर अनावरण ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, सरदार सत्यशिलराजे दाभाडे, तळेगाव दाभाडेचे पोलिस निरिक्षक नितीन लांडगे, सिटी रोटरी क्लबचे संस्थापक विलास काळोखे, जि.प. सदस्य नितीन मराठे, संतोष गोलांडे, संतोष शेळके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुबोध दाभाडे, रोटरी सिटी क्लबचे अध्यक्ष दीपक फल्ले आदींच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे येथे झाले.

१०० कलाकारांच्या साथीने ध्वनिप्रकाश योजनेच्या माध्यमातून प्रयोग साकारला जाणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्मा नारायण दाभाडे यांना सदर प्रयोग अर्पण करत असल्याचे अॅड. दाभाडे यांनी सांगितले. जांभूळकर यांनी दादरा नगर हवेली व स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा देत उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविक संतोष दाभाडे यांनी केले. महानाट्याच्या प्रयोगांची नोंद विक्रम म्हणून व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सत्यशिलराजे दाभाडे यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी महानाट्याच्या संकल्पनेला बळ देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. शिवसह्याद्री महानाट्य परिवार तसेच शिवप्रेमींनी नियोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर दाभाडे यांनी तर स्वागत संपत दाभाडे यांनी केले. आभार प्रदर्शन आनंद दाभाडे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02923 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..