तळेगावात एक हजार जणांची मोफत आरोग्य तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात एक हजार जणांची 
मोफत आरोग्य तपासणी
तळेगावात एक हजार जणांची मोफत आरोग्य तपासणी

तळेगावात एक हजार जणांची मोफत आरोग्य तपासणी

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. २७ : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम समितीचे माजी सभापती निखिल भगत तसेच योगिराज क्लिनीक, संकेत आय क्लिनिक आणि गौरव मेडिकल स्टोअर्स यांच्यावतीने यशवंतनगर-तपोधाम कॉलनीतील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या सात दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिरात एक हजारांहून अधिक नागरिकांसोबतच बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

यशवंतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक निखिल भगत यांच्या हस्ते तसेच डॉ. नेहा कुलकर्णी, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, गौरव वाघचौरे आदींच्या उपस्थितीत झाले.
रक्तदाब तपासणी, मधुमेह रक्त व लघवी तपासणी करून मोफत वैद्यकीय सल्ल्यासह गरजूंना जीवनसत्वांच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
बालकांसाठी हिमोग्लोबीन तपासणी, सुवर्णजल प्राशन व जंताचे औषध देण्यात आले. मुलांसाठी खाऊ व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. ४० वर्षापुढील नागरिकांसाठी मोतीबिंदू नेत्र तपासणी करण्यात आली. फैलावलेले साथीचे आजार लक्षात घेता नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन निखिल भगत यांनी यावेळी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02928 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..