तळेगावमध्ये ११ ठिकाणी गणपती मूर्तीदान केंद्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावमध्ये ११ ठिकाणी 
गणपती मूर्तीदान केंद्रे
तळेगावमध्ये ११ ठिकाणी गणपती मूर्तीदान केंद्रे

तळेगावमध्ये ११ ठिकाणी गणपती मूर्तीदान केंद्रे

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. १ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मोहीम हाती घेतली असून, फिरत्या निर्माल्य कलशांसह अकरा ठिकाणी गणपती मूर्तीदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करून जलप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन योग्य ठिकाणी करावे. तलाव, विहीर, नदी अथवा इतर नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये न करता नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या केंद्रावर मूर्तीदान करण्याचे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत शहरातील गणेशभक्तांच्या सोईसाठी गाव विभागात गावतळ्याशेजारी, बनेश्वर मंदिराजवळ, गोपाळे गुरुजी यांचे घराशेजारी, जुने नगरपरिषद कार्यालय, आदर्श शाळेजवळ, तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालय, मारुती मंदिर चौक आदी ठिकाणी तर स्टेशन विभागामध्ये यशवंतनगर (गोल मैदान), एम. एस. ई. बी. कार्यालय जवळ (स्टेशन तळे), नवीन समर्थ विद्यालय, चाकण रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. ६ अशी एकूण ११ ठिकाणी मूर्तीदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ज्या नागरिकांना घरचेघरी मूर्तीचे विसर्जन करावयाचे आहे, अशा नागरिकांसाठी नगरपरिषद कार्यालय आणि संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. ६ या दोन ठिकाणी अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे मोफत वाटप करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात निर्माण होणारे हार, फुले आणि इतर पूजा साहित्याचे निर्माल्य संकलन करण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दररोज गल्लोगल्ली ट्रॅक्टरद्वारे निर्माल्य कलश फिरविण्यात येत आहे. याबरोबरच मूर्तीदान केंद्राच्या ठिकाणीही निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. तळेगावातील घरगुती गणपतीचे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे निर्माल्य इतरत्र न टाकता निर्माल्य कलशात टाकावे, असे आवाहन नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02930 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..