मायमर वैद्यकीय महाविद्यालयात भौतिकोपचार दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मायमर वैद्यकीय महाविद्यालयात 
भौतिकोपचार दिन
मायमर वैद्यकीय महाविद्यालयात भौतिकोपचार दिन

मायमर वैद्यकीय महाविद्यालयात भौतिकोपचार दिन

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. १४ : माईर्स फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने भौतिकोपचार दिनानिमित्त १२ ते १६ सप्टेंबर दरम्यान मोफत भौतिकोपचार शिबिर चालू आहे. संधिवात प्रतिबंध आणि भौतिकोपचार उपाययोजना या संकल्पनेअतंर्गत जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी पथनाट्य सादर केले.
यशस्वी भौतिकोपचार तज्ञ होण्याकरिता अंगी कराव्या लागणाऱ्या कौशल्यासंबंधी यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटलच्या माजी भौतिकोपचार विभागप्रमुख डॉ. जयश्री कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता यांनी भौतिकोपचाराचे वाढते महत्त्व विशद केले. डॉ. कोतवाल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. मायमर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता, प्राचार्या डॉ. स्वाती बेलसरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत कामत आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. पूजा गुळुंजकर यांनी केले. माईर्स फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल घोडे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. डॉ. दिपिका बर्मन यांनी आभार मानले. गरजूंनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Tls22b02952 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..