किशोर आवारे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किशोर आवारे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर
किशोर आवारे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

किशोर आवारे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता.२५ : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या वतीने डॉ.निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना जाहीर झाला आहे.
कोरोना साथरोग, कोल्हापूर आणि चिपळूण पूर आदी आपत्कालीन परिस्थितीत आवारे यांनी स्वखर्चातून भरीव मदतकार्य केले आहे. त्याचीच दखल घेत संस्थेचे अध्यक्ष उद्धव कानडे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. येत्या शनिवारी (ता.२९) सायंकाळी पाच वाजता पुण्याच्या नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या नवीन सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, डॉ.सुधीर रसाळ, भारत सासणे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे.