मसापच्या मावळ कार्याध्यक्षपदी वर्तले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मसापच्या मावळ कार्याध्यक्षपदी वर्तले
मसापच्या मावळ कार्याध्यक्षपदी वर्तले

मसापच्या मावळ कार्याध्यक्षपदी वर्तले

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता.२८ : महाराष्ट्र साहित्य परिषद, मावळ शाखेच्या कार्याध्यक्षपदी लेखक ओंकार वर्तले यांची तर सचिवपदी प्रा.योगेश घोडके यांची निवड करण्यात आली. तर सहसचिवपदाची जबाबदारी नंदकिशोर नागुलपिल्ले यांच्यावर सोपविण्यात आली.
मसापच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीत आगामी २ वर्षांसाठी ही पदाधिकारी निवड करण्यात आली. मसापचे मावळ तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे, उपाध्यक्ष डॉ.प्रमोद बोराडे, प्रशांत दिवेकर, अशोक करंदीकर, सुधाकर देशमुख, सुरेश अत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषद, मावळ शाखेचे नोंदणीकृत सभासद होण्याचे आवाहन साहित्य रसिकांना करण्यात आले आहे.

TLS22B03771