आपल्या कामाला छंद बनवा : संजय जोशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपल्या कामाला छंद बनवा  : संजय जोशी
आपल्या कामाला छंद बनवा : संजय जोशी

आपल्या कामाला छंद बनवा : संजय जोशी

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता.१ : ‘‘नैतिक आणि वैध मार्गाने मिळविलेली संपत्तीच योग्य असते. त्यामुळे, आपल्या कामाला छंद बनवून पुढे जात राहिलात तर यश हमखास आहे. आयुष्याला नैतिकतेचे पाठबळ पुस्तके देतात. म्हणून विद्यार्थीदशेत वाचनाचा छंद जोपासायला हवा.’’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक संजय जोशी यांनी केले.
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जोशी हे बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी जोशी म्हणाले,‘‘कार्पोरेट क्षेत्राचा एक विशिष्‍ट काळ अनुभव घेऊन मी थांबलो. त्यानंतर, सुंदर जगाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनो आता कष्ट करा आणि आयुष्यभर आनंदात दिवस घालवा. आता मजा करत बसले तर पुढील आयुष्य हे कष्टप्रद असेल. आपल्या आयुष्यालाही संगीतासारख्या ‘मात्रा’ असायला हव्यात. म्हणजे ते नैतिकतेच्या चौकटीत बसते.’’ याशिवाय, त्यांनी स्वानंद, भाषा, पूर्णानंद, दाद, प्रसाद, लिहिणे, राजहंसी वृत्ती आणि स्मरण अशा आठ मात्रा विद्यार्थ्यांना विशद केल्या. यावेळी ''सेल्फी विथ बुक''या पुस्तक अभिप्राय स्पर्धेत यश मिळविलेल्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मलघे यांनी त्यांच्या अस्वस्थ भवताल या कविता संग्रहातील ग्रंथालय आणि पुस्तकांवर रचलेली कविता सादर केली. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे आणि कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.संदीप कांबळे सूत्रसंचालन यांनी केले. तर आभार प्रा.सत्यजित खांडगे यांनी मानले.