मालमत्ता कर थकबाकीदारांना तळेगावात जप्तीचे वॉरंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालमत्ता कर थकबाकीदारांना 
तळेगावात जप्तीचे वॉरंट
मालमत्ता कर थकबाकीदारांना तळेगावात जप्तीचे वॉरंट

मालमत्ता कर थकबाकीदारांना तळेगावात जप्तीचे वॉरंट

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. १७ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाकडून मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगरपरिषद हद्दीतील ज्या मालमत्ताधारकांनी मागील काही वर्षापासून मिळकतकराचा नियमित भरणा केलेला नाही आणि ज्यांची मिळकत कर थकबाकीची रक्कम ही ५० हजारांपेक्षा अधिक थकीत आहे, अशा सर्व मिळकतधारकांना जप्ती वॉरंट लागू करण्याची कारवाई नगरपरिषदेने सुरू केली आहे. सदर जप्ती वॉरंट कालावधीमध्ये थकीत रकमेचा भरणा नगरपरिषद कार्यालयात न केल्यास संबंधित मिळकत धारकांची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करून त्याच्या लिलाव प्रक्रियेमधून नगरपरिषद आपली देणी वसूल करून घेणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला या वर्षी शहरातील एकूण ३९, ८६१ मालमत्ता धारकांकडून ४३ कोटी २४ लाख हजार ९०० रुपये वसूल करायचे असून, या वर्षी नगरपरिषदेने वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. थकबाकीदारांनी आपल्या थकीत मिळकतकराचा भरणा त्वरित करून जप्तीची कारवाई टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी सरनाईक यांनी केले आहे.