एक कोटींचा मद्यसाठा सोमाटणेजवळ जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक कोटींचा मद्यसाठा 
सोमाटणेजवळ जप्त
एक कोटींचा मद्यसाठा सोमाटणेजवळ जप्त

एक कोटींचा मद्यसाठा सोमाटणेजवळ जप्त

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. २३ : विदेशी मद्याच्या १९ हजार बाटल्यांचे तब्बल साडेबाराशे खोके वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने सोमाटणेजवळ पकडून सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क तळेगाव विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. २३) सकाळी साडेदहाच्या सुमारास जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील, हॉटेल शांताईसमोर सापळा लावून, केवळ गोवा राज्यात विक्रीस वैध असलेला विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणारा ट्रक (क्र. एम एच-४६ एएफ-६१३८) जप्त करून कारवाई केली. आरोपी वाहनचालक प्रवीण परमेश्वर पवार (रा. तांबोळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि देविदास विकास भोसले (रा. खवणी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांना अटक केली असून, त्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सासवड विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रवीण शेलार, तळेगाव दाभाडे विभागाचे दुय्यम निरीक्षक दीपक सुपे, प्रशांत दळवी, संजय राणे, योगेंद्र लोळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.