टॅंकरच्या धडकेने 
दुचाकीस्वार ठार

टॅंकरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

तळेगाव स्टेशन, ता. १० : तळेगाव-चाकण महामार्गावर शुक्रवारी (ता. १०) सकाळी पावणेनऊला टॅंकरची पाठीमागून धडक
बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सुदवडी हद्दीत हा अपघात घडला. मुंबईहून चाकणकडे भरधाव जाणाऱ्या टॅंकरने (क्र. एमएच १३ डीक्यू-२१००) तळेगावहून चाकण एमआयडीसीकडे जाणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच-१९ डीडी-९३५३) पाठीमागून धडक दिली. चाक डोक्यावरून गेल्याने संतोष दादाराव सुरवाडे (वय- ३३, रा. तळेगाव स्टेशन) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टॅंकरचालक रामनारायण रतन यादव (रा. कल्याण पूर्व) याच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com