फेरीवाले, बचतगटांनी वसुंधरा अभियानास योगदान द्यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेरीवाले, बचतगटांनी वसुंधरा अभियानास योगदान द्यावे
फेरीवाले, बचतगटांनी वसुंधरा अभियानास योगदान द्यावे

फेरीवाले, बचतगटांनी वसुंधरा अभियानास योगदान द्यावे

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. १६ : पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश या पंचतत्वांशी संबंधित वसुंधरा अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. या हद्दीतील बचत गट आणि फेरीवाल्यांनी अभियानास योगदान देण्याचे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे. पंचतत्वांशी संबंधित जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण शाश्वत विकास करू शकणार नाही. हीच वेळ निसर्गास साथ देण्याची आहे. असे प्रतिपादन सरनाईक यांनी केले.
तसेच घनकचरा व्यवस्थापन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, अपारंपरिक, सौर ऊर्जा स्रोतांचा वापर, इलेक्ट्रिक वाहने, प्लास्टिक बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरामध्ये राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्थापित एकूण अडीचशे बचत गट आणि ६९३ फेरीवाले देखील शहरातील एक महत्त्वाचा घटक म्हणून अभियानास भरीव सहकार्य आणि योगदान देऊ शकतात. नगरपरिषद हद्दीतील शाळा, कार्यालय, बँका,भाजी मंडई, संस्था आदींचे बचत गट आणि फेरीवाले यांच्याकडून माझी वसुंधरा ई- शपथ घेण्यात येणार आहे. तळेगाव शहर कशा पद्धतीने स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याकामी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.