तळेगावात शिवजयंतीनिमित्त पालखी विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे घेत, ‘जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात शिवजयंतीनिमित्त पालखी
विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे घेत, ‘जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
तळेगावात शिवजयंतीनिमित्त पालखी विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे घेत, ‘जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

तळेगावात शिवजयंतीनिमित्त पालखी विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे घेत, ‘जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. १९ : पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती भगवे झेंडे घेत, शिवरायांच्या पराक्रमाची गीते गात, जय भवानी, जय शिवराय गगनभेदी घोषणांमध्ये इंद्रायणी महाविद्यालयाचा शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, चंद्रकांत शेटे, संजय साने, परेश पारेख, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. गुलाब शिंदे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी महाराजांना अभिवादन केले.
संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले की, परकीय शत्रूला सेवेला ठेवून भारतात सर्व प्रथम आरमाराची निर्मिती करणारे छत्रपती शिवराय, भारतीय नौदलाचे जनक आहेत. शत्रू बलाढ्य असेल तर तडजोड करणे, शत्रू बेसावध असेल तर हल्ला करणे अशा अनेक युद्ध तंत्राला आत्मसात करून स्वराजाचा पाया रचणारे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे तीन शब्दच हिंदुस्थानला अखंड ठेवू शकतात. राष्ट्रप्रेमाची भावना, स्त्रियांबद्दल आदरभाव आणि पराक्रम या त्रिसूत्रीची देणगी छत्रपतींनी आपल्या कर्तृत्त्वातून रयतेला दिली.
शिवव्याख्याते विवेक येवले, दीपक पवार यांची शिवव्याख्यानावर स्फूर्तिदायी भाषणे झाली.
वाणिज्य शाखेतील विद्यार्थींनींनी ‘झुलवा पाळणा’ या गीत सादर केले. सूत्रसंचालन धनश्री बधाले यांनी सूत्रसंचालन केले. प्रज्वल शेडगे यांनी स्वागत केले. वाणिज्य विभागाच्या प्रमुख प्रा. रुपकमल भोसले, प्राचार्य डॉ संभाजी मलघे, विद्यार्थी प्रज्वल शेडगे व पवन गायकवाड आदींच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्ष वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

फोटोः 03982