तळेगावात उद्यापासून गणेश व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात उद्यापासून 
गणेश व्याख्यानमाला
तळेगावात उद्यापासून गणेश व्याख्यानमाला

तळेगावात उद्यापासून गणेश व्याख्यानमाला

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. १५ : श्री गणेश प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारपासून राजगुरव कॉलनीमधील श्री गणेश मंदिर प्रांगणात तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तिन्ही दिवस सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या व्याख्यानमालेचे उद्‍घाटन आमदार सुनील शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी (ता.१७) ज्येष्ठ साहित्यिक प्रा. व .बा. बोधे हास्यमेव जयते, या विषयावरील प्रथम विचारपुष्प गुंफणार आहेत. शनिवारी (ता. १८) ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे भारताचा पत्ता काय, या विषयावर विचार मांडतील. अंतिम पुष्प सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ मला भेटलेली माणसे या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून गुंफणार आहेत. श्रोत्यांनी व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले सचिव दिलीप राजगुरव, बच्चू तांबोळी, प्रा. जीवन पाटील यांनी केले आहे.