Sun, May 28, 2023

तळेगावात ज्येष्ठ महिलेची आत्महत्या
तळेगावात ज्येष्ठ महिलेची आत्महत्या
Published on : 18 March 2023, 9:10 am
तळेगाव स्टेशन, ता.१८ : राहत्या घरात बेडरुममध्ये फॅनला ओढणीने गळफास लावून ज्येष्ठ महिलेने आत्महत्या केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. ही घटना शुक्रवारी (ता. १७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. भारती दत्तू सोनवणे (वय ५६, तळेगाव दाभाडे) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वैभव हिंगणे (वय ३३, वराळे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. सोनवणे या तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक म्हणून कार्यरत होत्या. नुकतीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.