Sun, June 11, 2023

मिंडेवाडीत ट्रकला धडकून
दुचाकीवरील दोघे ठार
मिंडेवाडीत ट्रकला धडकून दुचाकीवरील दोघे ठार
Published on : 17 March 2023, 4:39 am
तळेगाव स्टेशन, ता. १७ : तळेगाव-चाकण ‘एमआयडीसी’ जोड रस्त्यावर धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या ट्रकला धडकून दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना नवलाख उंबरेजवळील मिंडेवाडी (ता. मावळ) येथे घडली.
दत्ता गंगाराम खरात (वय- ३३, रा. शिरदे, ता. मावळ) आणि लहू भरत बगाड (वय- २२, रा. शिरदे, ता. मावळ) अशी मृतांची नावे आहेत.
या प्रकरणी रमेश कोंडिबा खरात यांनी फिर्याद दिली. रस्त्याच्याकडेला ट्रक उभा होता. त्यावेळी दुचाकीने मागून ट्रकला धडक दिली. त्यात दोनजण ठार झाले. ट्रकचालक मुकुटकुमार साधुसरन शर्मा (वय- ४०, रा. कोलकत्ता) याला पोलिसांनी अटक केली आहे.