जागतिक चिमणी दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेस मोठा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक चिमणी दिनानिमित्त 
चित्रकला स्पर्धेस मोठा प्रतिसाद
जागतिक चिमणी दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेस मोठा प्रतिसाद

जागतिक चिमणी दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेस मोठा प्रतिसाद

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. १९ ः चिमणी संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १९) सकाळी ‘पक्षी’ या विषयावर या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंतनगरमधील बायोडायवर्सीटी पार्कच्या निसर्गरम्य ठिकाणी सकाळी ९ ते १० या वेळेत पार पडलेल्या या स्पर्धेला तळेगावकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. तब्बल ७९६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवल्याने मावळातील सर्वात मोठी स्थानिक चित्रकला स्पर्धा ठरली.
फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक महेश महाजन यांनी चिमणी या विषयावर प्रबोधनपर माहिती सांगून, चिमणी संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
मोठ्या गटात अंकीत समंता प्रथम, आर्या रणकुंभ द्वितीय तर तेजस्विनी भाकरे हिने तृतीय क्रमांक पटकावला.
छोट्या गटात स्वाती केवट प्रथम, दिशा जगदाळे द्वितीय तर श्रावणी येवले हिने तृतीय क्रमांक पटकावला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आणि सुधीर राऊत यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक निखिल भगत यांच्या हस्ते स्पर्धकांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष नीरज शाही यांनी आभार मानले.
प्रकल्प प्रमुख डॉ. गणेश सोरटे, सुधाकर मोरे, अमित पोतदार, निशिकांत पंचवाघ, विवेक रामायणे, पूजा डोळस, दीपक शिरसाट आदींनी स्पर्धेचे नियोजन केले.

फोटो ः
04047