दिव्यांगांना पूर्ववत दरमहा तीन हजार अनुदान मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांना पूर्ववत दरमहा 
तीन हजार अनुदान मिळणार
दिव्यांगांना पूर्ववत दरमहा तीन हजार अनुदान मिळणार

दिव्यांगांना पूर्ववत दरमहा तीन हजार अनुदान मिळणार

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. १८ : जनसेवा विकास समितीने दिलेल्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सरनाईक यांनी सोमवारी (ता. १७) जनसेवा विकास समितीला लेखी पत्र देऊन तीन हजार रुपये मासिक अनुदान देणार असल्याचे जाहीर केल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तळेगाव नगर परिषद कार्यालयात सोमवारी जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधवांनी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, कार्याध्यक्ष कल्पेश भगत, माजी नगरसेवक सुनील कारंडे, रोहित लांघे, नीलेश पारगे, अनिल भांगरे आदी कार्यकर्त्यांसह दिव्यांग संस्थेचे किशोर कुलकर्णी, राजेंद्र थोरात,मनोज हब्बू,निखिल बोत्रे रंजना गोडसे, विठ्ठल हिंनकुले, स्वप्नील पाटील, किशोर दिघे तसेच बहुसंख्य महिला व बाल दिव्यांग देखील उपस्थित होते. जनसेवा विकास समितीकडून तळेगाव नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग बांधवांना प्रतिमहा तीन हजार रुपये अनुदान देण्याबाबत केलेल्या मागणीला अनुसरून नगर परिषदेमार्फत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पाच टक्के तरतुदीनुसार ९३ लाख ५२ हजार ९७५ रक्कम विभागून प्रती महा तीन हजार रुपयांप्रमाणे, तीन टप्प्यांत म्हणजे प्रती टप्पा नऊ हजार रुपये प्रमाणे अदा करण्यात येईल. यावर गरज असलेल्या उर्वरित रक्कमेबद्दल पुरवणी अंदाजपत्रकास मान्यता मिळण्यानंतर कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी जनसेवा विकास समिती आणि दिव्यांगांच्या शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर तळेगाव शहरातील दिव्यांग बांधवांना पूर्ववत तीन हजार रुपये मासिक अनुदान मिळणार असल्याचे जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर आवारे यांनी जाहीर केले.

‘‘नगरपरिषद हद्दीतील दिव्यांगांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पाच टक्के तरतुदीच्या रकमेतून दिव्यांग व्यक्तींना विभागून दिल्या जाणाऱ्या अनुदानात तूट येणार होती. त्यामुळे प्रत्येकी तीन हजार रुपये मासिक अनुदान पूर्ववत मिळण्यासाठी वाढीव तरतुदीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल.
- विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे