बलिदानातून मिळालेले महाराष्ट्राचे मराठीपण जपा : काकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलिदानातून मिळालेले महाराष्ट्राचे मराठीपण जपा : काकडे
बलिदानातून मिळालेले महाराष्ट्राचे मराठीपण जपा : काकडे

बलिदानातून मिळालेले महाराष्ट्राचे मराठीपण जपा : काकडे

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. ३ : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला महाराष्ट्र मिळाला आहे. संस्कृती, उद्योग, शिक्षणाच्या जोरावर उभे असलेले महाराष्ट्राचे मराठीपण आपण प्रत्येकाने जपायलाच हवे, असे आवाहन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केले.

६३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त काकडे यांच्या हस्ते इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन झाले. भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त विलास काळोखे, संजय साने, निरूपा कानिटकर, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डी फार्मसीचे प्राचार्य डॉ. जी. एस. शिंदे यांच्यासह विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुरेश थरकुडे यांनी सूत्रसंचालन केले.