तळेगावमध्ये पोलिसांचे
सशस्त्र पथ संचलन

तळेगावमध्ये पोलिसांचे सशस्त्र पथ संचलन

तळेगाव स्टेशन, ता. १८ ः गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तळेगाव दाभाडे पोलिसांनी तळेगाव आणि स्टेशन विभागात गुरुवारी (ता. १८) सायंकाळी सशस्त्र पथसंचलन केले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, सहायक पोलिस निरीक्षक नारायण पाटील, उपनिरीक्षक संदेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ५५ पोलिसांच्या तुकडीने तळेगावातील लिंब फाट्यापासून मारुती मंदिर चौक, राजेंद्र चौक, शाळा चौक, जिजामाता चौक मार्गे संचलन केले. तळेगाव स्टेशन विभागात स्टेशन चौक, वीरचक्र चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मराठा क्रांती चौकमार्गे चाकण रस्त्यावर झालेल्या सशस्त्र पथसंचलनाद्वारे पोलिस प्रशासनाने नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नागरिक आणि व्यावसायिकांनी घाबरून न जाता, प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी केले आहे.

फोटो ओळी : 04247

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com