पुनर्वापर केंद्राचे 
तळेगावात उद्घाटन

पुनर्वापर केंद्राचे तळेगावात उद्घाटन

तळेगाव स्टेशन, ता. २७ ः केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियानांतर्गंत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून स्थापित टाकाऊ वस्तू पुनर्वापर केंद्राचे तळेगावात शुक्रवारी (ता. २६) मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियानांतर्गंत प्रत्येक स्थानिक संस्थांना रिड्यूस, रीयूज, रिसायकल केंद्र अर्थात आरआरआर केंद्र स्थापन करण्याचे निर्देश केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत नगरपरिषद कार्यालय आणि मोरखळा घनकचरा व्यवस्थापन केंद्र अशा दोन ठिकाणी दोन आरआरआर केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
मुख्याधिकारी पाटील म्हणाले, ‘‘शहरातील नागरिकांनी वापरात नसलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे, लहान मुलांची खेळणी आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करुन, त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी संकलित वस्तूंचे नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करून विविध भागधारकांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. या उपक्रमामुळे आपले शहर स्वच्छ राहण्यास निश्चितच मदत होणार आहे.’’

उपमुख्याधिकारी ममता राठोड, कार्यालयीन अधीक्षक रविंद्र काळोखे, स्वच्छता निरीक्षक मयूर मिसाळ, तुकाराम मोरमारे, प्रमोद फुले, शहर समन्वयक गीतांजली होनमने, रोहित भोसले, सुजाता घोडेकर यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी उदघाटनप्रसंगी उपस्थित होते.


फोटो ः 04266

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com