
वडगावातील एका प्रभागात दोन कोटींची विकासकामे
वडगाव मावळ, ता. ४ : वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सातमध्ये सुमारे दोन कोटी बावीस लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
आमदार सुनील शेळके यांच्या निधीतून तसेच नगराध्यक्ष मयूर ढोरे व स्थानिक नगरसेवक चंद्रजीत वाघमारे यांच्या पाठपुराव्यातून प्रभाग सातमध्ये विविध कामांसाठी सुमारे दोन कोटी बावीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा पुनम जाधव, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, राजेंद्र कुडे, सुनील ढोरे, राहुल ढोरे, शारदा ढोरे, माया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटी संचालक राजेश भालेराव, प्रकाश कुडे, बिहारीलाल दुबे, सुधाकर वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रविण ढोरे, संतोष खैरे, अविनाश कुडे, मंगेश खैरे, शरद ढोरे, दिपक भालेराव, विशाल वहिले, अनिल ओव्हाळ, सोपान पाटोळे, सचिन ओव्हाळ, अशिष भालेराव आदी उपस्थित होते. सुमारे ७७ लाख रुपये खर्चून मिलींदनगर ते कुडेवाडा रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त ड्रेनेज लाईन, ६५ लाख ८० हजार रुपये खर्चून पंचवीस फूट उंचीचे एलईडी पथदिवे, ७३ लाख रुपये खर्चून कुडेवाडा, मिलिंनगर, लक्ष्मीनगर परिसरात बंदिस्त ड्रेनेज लाईन, नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, खैरे ते जाधव निवासस्थानापर्यंत बंदिस्त लाईन आदी कामांचा यात समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02378 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..