खरीप हंगाम नियोजन ः प्रति हेक्टरी चार हजार ५०० किलोग्रॅम वाढविण्यासाठी विविध उपाययोजना तेरा हजार हेक्टरवर भात पीक घेणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरीप हंगाम नियोजन ः प्रति हेक्टरी चार हजार ५०० किलोग्रॅम वाढविण्यासाठी विविध उपाययोजना 

तेरा हजार हेक्टरवर भात पीक घेणार
खरीप हंगाम नियोजन ः प्रति हेक्टरी चार हजार ५०० किलोग्रॅम वाढविण्यासाठी विविध उपाययोजना तेरा हजार हेक्टरवर भात पीक घेणार

खरीप हंगाम नियोजन ः प्रति हेक्टरी चार हजार ५०० किलोग्रॅम वाढविण्यासाठी विविध उपाययोजना तेरा हजार हेक्टरवर भात पीक घेणार

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २३ ः मावळ तालुका कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी नियोजन पूर्ण केले आहे. सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी दिली. मागील पाच वर्षातील तालुक्यातील भाताची सरासरी उत्पादकता प्रति हेक्टरी तीन हजार ५२६ किलोग्रॅम असून ती प्रति हेक्टरी चार हजार ५०० किलोग्रॅम वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्याची माहिती त्यांनी दिली.

मावळ तालुक्यात खरीप पिकाखाली ७१ गावातील १५ हजार ४४७ हेक्टर क्षेत्र आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात, १०० हेक्टर क्षेत्रावर नाचणी, २८० हेक्टर क्षेत्रावर तूर, पावटा, वाल, घेवडा आदी कडधान्ये, २०० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, ५२५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन व सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रावर चारा पिके घेण्याचे नियोजन कृषी खात्याने केले आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षात भात पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. यापूर्वी भाताखालील सरासरी क्षेत्र ९ हजार ७०० हेक्टर होते ते आता १३ हजार हेक्टर पर्यंत वाढले आहे. गेल्या हंगामात १२ हजार १२० हेक्टरवर भात लागवड झाली होती. तालुक्यातील भुईमुगाच्या क्षेत्रात मात्र मोठी घट झाली आहे. सुमारे १ हजार ८०० हेक्टर वरून हे क्षेत्र २०० हेक्टर पर्यंत खाली आले आहे. मात्र भुईमुगाची जागा आता सोयाबीनने घेतली आहे. या पिकाचे क्षेत्र ५२५ हेक्टर पर्यंत वाढले आहे. तालुक्यातील नाचणी व कडधान्याचे प्रमाणही कमी झाले आहे.

उत्पादकता वाढीसाठी उपाययोजना
गेल्या काही वर्षात कृषी खात्याचे मार्गदर्शन व प्रयत्न तसेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद यामुळे उत्पादकतेमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षातील भाताची सरासरी उत्पादकता प्रति हेक्टरी तीन हजार ५२६ किलोग्रॅम, नाचणीची प्रति हेक्टरी ९४७ किलोग्रॅम, भुईमुगाची दोन हजार ३६५ किलोग्रॅम व सोयाबीनची प्रति हेक्टरी दोन हजार ६०० किलोग्रॅम एवढी आहे. येत्या हंगामात या पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे उद्दिष्ट्य कृषी खात्याने ठरविले आहे. भात प्रति हेक्टरी चार हजार ५०० किलोग्रॅम, नाचणी एक हजार १०० किलोग्रॅम, भुईमूग एक हजार ५०० किलोग्रॅम व सोयाबीनची उत्पादकता प्रति हेक्टरी तीन हजार किलोग्रॅम पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्टय आहे. उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित वाणांचा वापर, रोपवाटिका व्यवस्थापन, योग्य वयाच्या रोपांची पुनर्लागवड, योग्य प्रमाणात रोपांचा वापर, नियंत्रित ( चार सूत्री ) लागवड, एकात्मिक खते, कीड, तण व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व काढणी पश्चात मूल्यसंवर्धन आदी उपाययोजना राबविण्यात येणार आहे.

जनजागृती आदी उपक्रम राबविणार

-गावोगावी ग्राम कृषी विकास समित्या स्थापन
-तीस गावांमध्ये क्रॉपपॅप संलग्न शेतकरी शेतीशाळा,
- १२ गावांमध्ये महिला शेतीशाळा,
- अनेक गावांमध्ये जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतांचा वापर,
-जैविक बीज प्रक्रिया अंमलबजावणी,
-युरिया ब्रिकेटचा वापर, नॅनो युरिया फवारणी, पाचट कुजवणे,
-हुमनी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे
- आत्माअंतर्गत ४० हेक्टर क्षेत्रावर आंबेमोहोर व २५ हेक्टर क्षेत्रावर नाचणी पिकांचा प्रयोग करणार
- पाच शेतीशाळा आयोजित करून सोळा प्रशिक्षणे देणार


मावळ तालुका कृषी विभागाने खरीप हंगामासाठी नियोजन पूर्ण केले आहे. महाबीजकडून भाताचे बाराशे क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे व खताची उपलब्धता करण्यात येईल. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुधारित पद्धतीने खरीप पिके घेऊन उत्पादकता वाढीसाठी प्रयत्नशील राहावे.
- दत्तात्रेय पडवळ, मावळ तालुका कृषी अधिकारी.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02406 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..