जांभवली आज मूर्ती प्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांभवली आज मूर्ती प्रतिष्ठापना
जांभवली आज मूर्ती प्रतिष्ठापना

जांभवली आज मूर्ती प्रतिष्ठापना

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २४ : जांभवली येथील कोंडेश्वर देवस्थान येथे बुधवारी (ता.२५) भगवान शंकराच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. मावळ तालुक्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जांभवली येथील भगवान शंकर मंदिरात ग्रामस्थांच्या पुढाकाराने व वडगाव येथील श्री. पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, माजी सरपंच भगवान पवार व पोलिस पाटील दत्तात्रेय लालगुडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि लोकवर्गणीतून भगवान शंकर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.

माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे हस्ते व खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे. कोंडेश्वर देवस्थान, श्री पोटोबा देवस्थान, अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि सत्संग भजनी मंडळ यांनी संयोजन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02409 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top