दळवी कॉलेजचा निकाल १०० टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दळवी कॉलेजचा निकाल १०० टक्के
दळवी कॉलेजचा निकाल १०० टक्के

दळवी कॉलेजचा निकाल १०० टक्के

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ११ : कोथुर्णे येथील ज्ञानराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरूबाई पांडुरंग दळवी ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा कला व वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. निकिता विकास ठुले हिने ८४.८३ टक्के गुण मिळवून पवना केंद्रात वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. काजल हिरामण ठुले हिने ८२.८३ टक्के गुण मिळवून दुसरा तर अपर्णा अबू निंबळे हिने ८०.५० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. कला शाखेत स्नेहा हिरामण राऊत हिने ८९.३३ टक्के गुण मिळवून पवना केंद्रात तसेच तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. स्वाती राजाराम सुतार हिने ७७. ५० टक्के गुण मिळवून दुसरा तर प्रतीक्षा पांडुरंग आडकर हिने ७१ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, प्राचार्य दत्तात्रेय कराळे व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02447 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top