वडगावातील अतिक्रमणे काढून टाका नगरपंचायत प्रशासनाकडे पोलिसांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावातील अतिक्रमणे काढून टाका
नगरपंचायत प्रशासनाकडे पोलिसांची मागणी
वडगावातील अतिक्रमणे काढून टाका नगरपंचायत प्रशासनाकडे पोलिसांची मागणी

वडगावातील अतिक्रमणे काढून टाका नगरपंचायत प्रशासनाकडे पोलिसांची मागणी

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २ ः वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत वाढलेल्या अतिक्रमणांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, ती काढून टाकावीत, अशी मागणी खुद्द पोलिसांनी नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे.
वडगाव बाजारपेठेत सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीला नागरिकांप्रमाणे पोलिस प्रशासनही कंटाळले असून, त्यातूनच पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना बाजारपेठेतील अतिक्रमण काढावे, अशी मागणी करणारे पत्र पाठवले आहे. अतिक्रमणे काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याची तयारीही दर्शवली आहे.
वडगाव हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती, भूमिअभिलेख, वन, दुय्यम निबंधक अशी सर्व शासकीय कार्यालये आहेत. वडगाव न्यायालयामध्ये नुकतेच जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे शहरात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. बाजारपेठेच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण वाढल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. 
सध्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून, या कामाची सुरवात दहा मीटर काँक्रिट व दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक मीटर पेव्हिंग ब्लॉक व त्याखाली ड्रेनेज, पाणी व विद्युतलाईन या पद्धतीने सुरू करण्यात आले वडगावाहोते. शिवाजी चौकापासून त्यामध्ये बदल करण्यात आला असून, दहा मीटर काँक्रिट व त्याखालीच ड्रेनेज, पाणी व विद्युतलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठेतही हा रस्ता दहा मीटर रुंदीचाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक व व्यापारी यांचे आपापसांत वाद होण्याचे प्रकारही वाढले आहेत. मुख्य रस्त्यालगत न्यायालयाची इमारतही आहे म्हणून नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना अतिक्रमणे काढण्याचे पत्र पोलिस निरीक्षक भोसले यांनी दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02505 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top