‘खत पुरवठा सुरळीत करावा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘खत पुरवठा 
सुरळीत करावा’
‘खत पुरवठा सुरळीत करावा’

‘खत पुरवठा सुरळीत करावा’

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ६ : मावळ तालुक्यात शेतीची लगबग सुरू झाल्याने खत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांनी कृषी खात्याकडे केली आहे.
खांडभोर यांनी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यात शेतीची कामे सुरू असून आता प्रामुख्याने भात लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे. शेतकऱ्यांचा युरिया, सम्राट व इतर खते वापरण्यावर भर असतो. तालुक्यात सध्या कमी प्रमाणात खत पुरवठा होत असल्याने तालुक्यातील शेतकरी चाकण व इतर ठिकाणावरून खते आणत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ व अतिरिक्त पैसे खर्च होत आहेत. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी खत पुरवठा सुरळीत करावा. जेणे करून खतांअभावी शेतीची कामे रखडायला नको.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02512 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..