वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना
शालेय साहित्याचे वाटप
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १५ ः आरएमके ग्रुपच्यावतीने येथील कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहातील गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढे शालेय साहित्य वाटप करून अनोख्या पद्धतीने गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. तळेगाव येथील आरएमके ग्रुपने वडगाव येथील विश्व हिंदू परिषद संचलित गोपाळराव देशपांडे वसतीगृहात गुरू पौर्णिमा उत्सव साजरा केला. भारतमातेचे पूजन करुन वसतगृहात राहणाऱ्या दऱ्या खोऱ्यातील गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके शालेय साहित्य वाटप करण्यात आले. खाऊ वाटपही करण्यात आले. आरएमके ग्रुपचे संस्थापक उद्योजक रामदास काकडे यांच्या पुढाकाराने हा गुरूपौर्णिमा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी रणजित काकडे, गोरख काकडे, सुमित जाधव, अमोल पगडे, हेमंत काकडे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

वडगाव मावळ ः गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून आरएमके ग्रुपच्यावतीने वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना मान्यवर.
फोटो ः 04025

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02531 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top