सभासदांना दहा टक्के लाभांश देणार मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सभासदांना दहा टक्के लाभांश देणार
मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची घोषणा
सभासदांना दहा टक्के लाभांश देणार मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची घोषणा

सभासदांना दहा टक्के लाभांश देणार मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची घोषणा

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १६ ः मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात झाली. सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष सुमीत नळे यांच्या अध्यक्षतेखाली वडगाव येथे झालेल्या सभेला भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, देवा गायकवाड, गणेश भेगडे, कृष्णा भांगरे, विष्णू शिंदे, बाबासाहेब औटी, रघुनाथ रोकडे, रामराव जगदाळे, दिलीपकुमार वेदपाठक आदी उपस्थित होते.
आमदार शेळके यांनी संस्थेचे कार्यालय उभारणीसाठी १० लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले. इतर मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याचा व पतसंस्थेच्या कामकाजाचा गौरव केला. संस्थेचे अध्यक्ष नळे यांनी सभेत सभासदांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर केल्या. विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा व विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष जालिंदर कांबळे, कार्यकारी संचालक राहुल लंबाते, संचालिका शोभा वहिले, सुहास धस, दीपक मेमाणे, कल्याणी रासकर, संदीप कांबळे आदींसह सर्व संचालक, सर्व संघटनांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. सुहास धस यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन राहुल लंबाते यांनी केले. हरिभाऊ आडकर, मुकुंद तनपुरे, नारायण कांबळे, प्रमोद भोईर यांनी सूत्रसंचालन केले. सुमीत नळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02533 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top