गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला वडगावात अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या
तरुणाला वडगावात अटक
गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला वडगावात अटक

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला वडगावात अटक

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २५ : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी बेकायदा गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला वडगाव येथील बाजारपेठेत रंगेहात पकडले.
स्वप्नील किसन मुऱ्हे (वय ३३, रा. सोमाटणे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या जवळ एक गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आली आहेत. ‌‌‌‌‌पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.२५) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना सहायक उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांना वडगाव मावळ येथील एका व्यक्तीकडे बेकायदा पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, सहायक उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, हनुमंत पासलकर, पोलिस हवालदार चंद्रकांत जाधव, प्राण येवले, सुरेखा लोंढे, नंदा कदम, सुजाता कदम यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीस अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना व बेकायदा हेतूने कमरेला बाळगलेले एक गावठी पिस्तूल, मॅगझीन मध्ये दोन जिवंत काडतुसे आणि दुचाकी असा एकूण ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. आरोपीस पुढील कारवाईसाठी वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02557 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top