राजकारणाबरोबरच समाजकारणही महत्त्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकारणाबरोबरच समाजकारणही महत्त्वाचे
राजकारणाबरोबरच समाजकारणही महत्त्वाचे

राजकारणाबरोबरच समाजकारणही महत्त्वाचे

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २६ : ‘‘राजकारणाबरोबरच समाजकारणही महत्त्वाचे असल्याने कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून समाजातील गरीब व गरजू व्यक्तींना आवश्यक ती मदत करावी,’’ असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष मयूर ढोरे व उद्योजक राजेश बाफना यांच्या संकल्पनेतून वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गरजू रुग्णांना घरगुती वापरासाठी अत्यावश्यक सर्जिकल वस्तूंचा लोकार्पण सोहळा सोमवारी झाला. आमदार शेळके यांच्या हस्ते गरजू रुग्णांना बेड, गादी, व्हीलचेअर, ऑक्सिजन सिलिंडर, कमोड चेअर, स्टीक, वॉकर, सलाईन स्टँड, वाफेचे मशिन, पाण्याची गादी, हवेची गादी, स्ट्रेचर आदी साहित्य प्रदान करण्यात आले. मावळची सुवर्णकन्या हर्षदा शरद गरुड हिचा नागरी सत्कार करण्यात आला. अनेक पदाधिकाऱ्यांनी तिला आर्थिक मदत जाहीर केली. तिच्या वेटलिफ्टिंगमधील पुढील वाटचालीसाठी बाबूराव वायकर, युवक अध्यक्ष अतुल वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे मित्र परिवाराकडून रोख एक लाख एक हजार रुपयांची मदत देण्यात आली.
संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, गणेश ढोरे, बाबूराव वायकर, मयूर ढोरे, पूनम जाधव, सुभाष जाधव, मंगेश ढोरे, तुकाराम ढोरे, दीपाली गराडे उपस्थित होते.
शेळके म्हणाले, ‘‘गेल्या अडीच वर्षात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून, सद्यःस्थितीत सुमारे एक हजार कोटींची विकास कामे सुरू आहेत. राज्यात सत्तांतर झाले असले तरी त्याचा विकास कामांवर कोणताही परिणाम होणार नाही. पुढील अडीच वर्षातही मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहू. तालुक्यातील खेळाडूंना आवश्यक ती मदत करावी.’’
शरद ढोरे यांनी स्वागत केले. शहराध्यक्ष प्रवीण ढोरे यांनी प्रास्ताविक केले. अतुल राऊत यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धेश ढोरे यांनी आभार मानले.

वडगाव मावळ : शहर राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित कार्यक्रमात मावळची सुवर्णकन्या हर्षदा गरुड हिला एक लाख रुपयांची आर्थिक मदत देताना आमदार सुनील शेळके, नगराध्यक्ष मयूर ढोरे, युवक अध्यक्ष अतुल वायकर आदी.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02559 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..