वडगावच्या उपनगराध्यक्षपदी ‘राष्ट्रवादी’चे राजेंद्र कुडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावच्या उपनगराध्यक्षपदी
‘राष्ट्रवादी’चे राजेंद्र कुडे
वडगावच्या उपनगराध्यक्षपदी ‘राष्ट्रवादी’चे राजेंद्र कुडे

वडगावच्या उपनगराध्यक्षपदी ‘राष्ट्रवादी’चे राजेंद्र कुडे

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २७ ः वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र विठ्ठलराव कुडे यांची निवड झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.
नगरपंचायतीच्या यापूर्वीच्या उपनगराध्यक्षा पूनम जाधव यांनी पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे नुकताच राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी बुधवारी नगरपंचायत कार्यालयात पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभा बोलाविण्यात आली होती. उपनगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजेंद्र कुडे यांनी तर भाजपकडून किरण म्हाळसकर यांनी अर्ज दाखल केला होता. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात कुडे यांना दहा तर म्हाळसकर यांना सहा मते मिळाली. उपनगराध्यक्षपदी कुडे यांनी चार मतांनी विजय मिळवला. मावळत्या उपनगराध्यक्षा पूनम जाधव, राहुल ढोरे, चंद्रजित वाघमारे, शारदा ढोरे, प्रमिला बाफना, माया चव्हाण, पूजा वहिले, सायली म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, दिनेश ढोरे, प्रवीण चव्हाण, अर्चना म्हाळसकर, दीपाली मोरे हे नगरसेवक उपस्थित होते. भाजपच्या सुनीता भिलारे उशिरा आल्याने त्यांना मतदानात सहभाग घेता आला नाही तर दशरथ केंगले हे नगरसेवक अनुपस्थित होते.
निवडीनंतर काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, संत तुकाराम कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, मंगेश ढोरे, तुकाराम ढोरे, पंढरीनाथ ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, राजेश बाफना, विशाल वहिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, युवक अध्यक्ष अतुल वायकर, गणेश म्हाळसकर, शरद ढोरे, चंद्रकांत ढोरे, सुरेश जांभूळकर, विलास दंडेल, अतुल राऊत, मंगेश खैरे, सोमनाथ धोंगडे, गणेश पं. ढोरे आदींच्या उपस्थितीत राजेंद्र कुडे यांचा सत्कार करण्यात आला. वाद्य पथकासह गावातून मिरवणूक काढण्यात आली.

फोटो ः 04083,

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02561 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..