वडगावात चोरट्यांची टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावात चोरट्यांची टोळी जेरबंद
वडगावात चोरट्यांची टोळी जेरबंद

वडगावात चोरट्यांची टोळी जेरबंद

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ३१ : वडगाव पोलिसांनी बिल्डींग मटेरिअल चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्याकडून १ लाख ४७ हजार,९४७ रुपयांचा माल जप्त केला. हेमंतकुमार बेहरा (वय ३३), नरोत्तम स्वाईन (वय २८), महेश नायक (वय २१) गुलाब मानिकपुरी (वय २१, सर्व रा. नाईकनवरे बिल्डकॉन प्रा. लि वडगाव-मावळ, मूळ रा. आसाम) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. येथील नाईकनवरे बिल्डकॉन प्रा. लिमिटेड या बांधकाम साइडवरून जग्वार कंपनीचे ब्रँडेड कॉक, शॉवर, अँगल टॉप कव्हर आदी साहित्यांची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची चौकशी करून या टोळीला जेरबंद केले.चोरीस गेलेल्या मुद्देमालासह आरोपींना अटक केली.पोलिस उप निरीक्षक शीला खोत पुढील तपास करत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02572 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..