पावसाने ओढ दिल्याने भात लागवड रखडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाने ओढ दिल्याने
भात लागवड रखडली
पावसाने ओढ दिल्याने भात लागवड रखडली

पावसाने ओढ दिल्याने भात लागवड रखडली

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २ : मावळ तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने भात लागवड रखडली आहे. पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी विहिरी, ओढ्या-नाल्याचे पाणी खाचरात वळवून भात लागवड उरकण्याची कसरत करत आहेत.

तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. कडक ऊनामुळे माळरानावरील भात खाचरे कोरडी पडली आहेत. तालुक्यात सुमारे ८० टक्के भाग लागवड पूर्ण झाली आहे. पश्चिम पट्ट्यात बहुतांशी लागवड उरकली आहे. मात्र निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी आकाशाला डोळे लावून बसले आहेत. यंदा पाऊस उशिरा सुरु झाल्याने पूर्व भागातील रोपे लहान आहेत. काही ठिकाणी रोपे उगवणीच्या काळात अतिवृष्टी झाल्यामुळे रोपांची उगवण पातळ झाली आहे. त्यामुळे रोपे थोडी मोठी होण्याची शेतकरी वाट पाहत असताना पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02576 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top