‘आगामी निवडणुकीत ओबीसीच्या सक्षम उमेदवारांना संधी द्यावी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आगामी निवडणुकीत ओबीसीच्या
सक्षम उमेदवारांना संधी द्यावी’
‘आगामी निवडणुकीत ओबीसीच्या सक्षम उमेदवारांना संधी द्यावी’

‘आगामी निवडणुकीत ओबीसीच्या सक्षम उमेदवारांना संधी द्यावी’

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ३ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील सक्षम ओबीसी, अनुसुचित जाती व जमातीमधील इच्छुक उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी कोअर कमिटी सदस्य आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे, सुभाष जाधव, बाबुराव वायकर, दीपक हुलावळे आदींची भेट घेऊन निवेदन दिले. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका ओबीसी आरक्षित जागेवर अनेक ओबीसी तरुण उमेदवार इच्छूक आहेत. ते पक्षात सक्रीय आहेत. मावळ तालुक्यात ओबीसी सेल, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभाग यांचा संघटनेच्या बांधणीमध्ये मोठा वाटा आहे. पक्षात सक्रीय काम करत असलेल्या इच्छुक उमेदवारांना ओबीसी, अनुसुचित जाती व जमाती आरक्षित जागेवर उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे जिल्हा ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका ओबीसी सेल अध्यक्ष मंगेश खैरे, महिला अध्यक्षा संध्या थोरात, आयुब शिकीलकर, अंकुश आंबेकर, चंद्रजित वाघमारे, विकी लोखंडे, सोमनाथ धोंगडे, गोकुळ किरवे, मयुर गुरव, स्वप्निल शेवकर, ज्योती आंबेकर, सविता मंचरे, वैशाली लगाडे, अर्चना भोकरे, नीलिमा शिंदे, सुधा भालेकर, लक्ष्मी गजाकोश, गणेश पाटोळे, सोनू भालेराव, राहिल तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02577 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..