
भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
वडगाव मावळ, ता. ६ : मावळ तालुक्यात भात पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मावळ तालुका आदिवासी भटक्या बहुजन संघटनेने केली आहे. संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांना निवेदन देण्यात आले.
मावळ तालुक्यात यावर्षी मोसमी पाऊस अनियमित पडल्यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. भातपीक हे पावसाळी प्रमुख पीक असल्यामुळे शेतकरी प्रामुख्याने याच पिकावर अवलंबून असतो. शासनाने त्वरित बाधितांचे पंचनामे करून नुकसान भरपाई रक्कम द्यावी. तसेच शासनाने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी शासनाने आदिवासी, भटक्या-विमुक्त समूहातील तसेच वंचित बहुजनांना १३ ऑगस्ट पूर्वी बेघरांना घरे उपलब्ध करून द्यावी, म्हणजे घरावर सन्मानाने तिरंगा फडकविता येईल अशी मागणीही संघटनेने केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत मोरे, राजू वरघडे, गणेश गायकवाड, प्रा. महेंद्र साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02587 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..