वडगाव शहर भाजपकडून ‘हर घर तिरंगा’ अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव शहर भाजपकडून 
‘हर घर तिरंगा’ अभियान
वडगाव शहर भाजपकडून ‘हर घर तिरंगा’ अभियान

वडगाव शहर भाजपकडून ‘हर घर तिरंगा’ अभियान

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ९ : ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा वडगाव शहर भाजप नगरसेवकांकडून शुभारंभ करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. वडगाव शहर भाजप नगरसेवकांकडून या अभियानासाठी नागरिकांना विनामूल्य राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहे. नगरसेवक किरण म्हाळसकर यांनी माळीनगर प्रभागातील रहिवाशांना राष्ट्रध्वज घरोघरी प्रदान करून अभियानाचा शुभारंभ केला. नागरिकांनी १३ ते १५ ॲागस्ट या कालावधीत घरावर राष्ट्रध्वज लावून ‘हर घर तिरंगा’ या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02597 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..