चोरीचे सोने विकत घेणाऱ्या शिक्षकाला वडगावात अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीचे सोने विकत घेणाऱ्या
शिक्षकाला वडगावात अटक
चोरीचे सोने विकत घेणाऱ्या शिक्षकाला वडगावात अटक

चोरीचे सोने विकत घेणाऱ्या शिक्षकाला वडगावात अटक

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १० : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलांना लुटून त्यांच्याकडील सोने चोरणाऱ्या टोळीकडून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या एका शिक्षकाला वडगाव पोलिसांनी अटक केली. तो तीन वर्षांपासून फरारी होता. दशरथ संभाजी शिवेकर ( वय ४३ वर्षे, रा. साई समर्थ नगर, तळेगाव दाभाडे )असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ‌पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नोव्हेंबर २०१९ मध्ये कान्हे येथून रस्त्याने जाणाऱ्या एका ७० वर्षीय महिलेस लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत घेऊन पवनानगर रोडवर तिच्याकडील १० हजार रुपयांची रोख रक्कम व दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. त्यावेळी पोलिसांनी सोने चोरी करणाऱ्या टोळीस अटक करून चोरलेल्या दागिन्यांची विचारणा केली असता त्यांनी तळेगाव दाभाडे येथील सोन्या चांदीचे व्यापारी व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असलेल्या दशरथ शिवेकर यांचे नाव सांगितले होते. शिवेकर हे चोरीचे दागिने घेऊन चोरांना अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याने पोलिस त्यांचा शोध घेत होते. ‌‌‌‌‌‌‌अखेर शनिवारी त्यांना अटक करण्यात आली.पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विकास सस्ते, सुनील जावळे, श्रीशैल कंटोळी, अमोल तावरे यांनी तपास करून फरारी आरोपीला अटक केली.

‌‌


‌‌

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02599 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..