लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाचे आमिष दाखवून 
महिलेवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता.१३ : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकाला गटविकास अधिकाऱ्यांनी शुक्रवारी निलंबित केले.
किशोर आंद्रेस शेळके (वय ३४, रा. उंबरी बाळापूर, ता. संगमनेर) असे कारवाई झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. कोथुर्णे येथील घटनेबाबत शुक्रवारी घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी शेळके याने महिलेवर केलेल्या अत्याचाराला वाचा फोडली होती व अत्याचार करूनही तो शाळेत कार्यरत असल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले होते. त्याची दखल घेऊन गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी शेळके याच्यावर निलंबनाची कारवाई केली. शेळके याने एका निराधार महिलेला लग्नाचे आमिष दाखवत काही वर्ष शारीरिक संबंध ठेवले व नंतर तिची फसवणूक करत दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले. त्यानंतर पीडित महिलेने वडगाव मावळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मे महिन्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्याने अटकपूर्व जामीन मिळविल्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई झाली नव्हती व तो शाळेत कार्यरत होता.
आवारे यांनी शुक्रवारी हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर त्याच दिवशी गटविकास अधिकारी भागवत यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशीचे आदेश दिले. ज्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला होता. त्याबाबत पोलिस ठाण्याकडून आमच्याकडे अहवाल आला नव्हता. १२ तारखेला अहवाल प्राप्त झाल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती भागवत यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02613 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..