जांभूळ-सांगवी ग्रुपला स्मार्ट ग्राम पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांभूळ-सांगवी ग्रुपला
स्मार्ट ग्राम पुरस्कार
जांभूळ-सांगवी ग्रुपला स्मार्ट ग्राम पुरस्कार

जांभूळ-सांगवी ग्रुपला स्मार्ट ग्राम पुरस्कार

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. १६ : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मावळ तालुक्यातील जांभूळ-सांगवी ग्रुप ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोशारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जांभूळ ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच नागसेन ओव्हाळ व ग्रामसेविका कल्याणी लोखंडे यांनी पुरस्कार स्वीकारला. उपसरपंच एकनाथ गाडे, माजी सरपंच संतोष जांभूळकर, सदस्य अमित ओव्हाळ, कुंदा खांदवे, कल्पना काकरे, तृप्ती जांभूळकर, स्नेहल ओव्हाळ, रूपाली गायकवाड, रखमाबाई भोईर आदी उपस्थित होते. जांभूळ व सांगवीतील विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेने गावाला पुरस्कार देऊन सन्मानित केले, अशी प्रतिक्रिया सरपंच नागसेन ओव्हाळ यांनी व्यक्त केली. यापुढील काळातही गावात विकास कामांची घौडदौड अशीच सुरू राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02618 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..