‘पीएमपीचे पास सुविधा केंद्र वडगावमध्ये सुरू करावे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीएमपीचे पास सुविधा केंद्र
वडगावमध्ये सुरू करावे’
‘पीएमपीचे पास सुविधा केंद्र वडगावमध्ये सुरू करावे’

‘पीएमपीचे पास सुविधा केंद्र वडगावमध्ये सुरू करावे’

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २५ ः पीएमपीएलने मावळ तालुक्यातील विद्यार्थी व प्रवाशांच्या सोयीसाठी वडगाव येथे पास सुविधा केंद्र सुरू करावे, अशी मागणी आंदर मावळातील पदाधिकाऱ्यांनी पीएमपीएलच्या वाहतूक व्यवस्थापकांकडे केली आहे.
टाकवे बुद्रुक येथील राजू शिंदे, स्वामी जगताप, दत्ता घोजगे, मारुती तुकाराम असवले, अनिल बंडोबा असवले आदी पदाधिकाऱ्यांनी वाहतूक व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएमपीएलची मावळ तालुक्यात निगडी ते लोणावळा, निगडी ते टाकवे बुद्रुक, निगडी ते नवलाख उंबरे, निगडी ते उर्से, निगडी ते गंहुजे अशी बस सेवा चालू आहे. या बससेवेचा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर प्रवासी लाभ घेत आहेत. परंतु तालुक्यातील हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच मासिक पास काढून दैनंदिन प्रवास करणारे कामगार यांना मासिक पास काढण्यासाठी निगडी येथे जावे लागते. त्यासाठी प्रवाशांना वेळ व पैसा खर्च करावा लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी मावळ तालुक्यातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना पास मिळण्याची सुविधा वडगाव मावळ येथे करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02644 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..