तळेगाव दाभाडे ते रायगड एसटी सुरू करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव दाभाडे ते रायगड
एसटी सुरू करण्याची मागणी
तळेगाव दाभाडे ते रायगड एसटी सुरू करण्याची मागणी

तळेगाव दाभाडे ते रायगड एसटी सुरू करण्याची मागणी

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २७ ः शिवभक्तांच्या सोयीसाठी तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड अशी नियमित एसटी बस सेवा सुरु करावी, अशी मागणी वडगाव येथील गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्थेने केली आहे.
संस्थेचे पदाधिकारी श्यामराव ढोरे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव दाभाडे आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातून असंख्य शिवभक्त रायगडाची नियमित वारी करतात. काही जण सह कुटुंब रायगडाच्या दर्शनासाठी जातात. मावळ तालुक्यातून किल्ले रायगडावर थेट जाण्यासाठी वाहतुकीची कोणतीही सोय उपलब्ध नाही. त्यामुळे शिवभक्त सह कुटुंब, वैयक्तिक व सामूहिकरीत्या जाऊ इच्छितात. त्यांची गैरसोय होते. त्यांच्या सोयीसाठी रायगडला जाण्यासाठी तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड अशी नियमित एसटी बस सेवा चालू करावी. ही बससेवा तळेगाव दाभाडे-लोणावळा-पाली-किल्ले रायगड (परतीचा मार्ग तसाच) किंवा तळेगाव दाभाडे-मुळशी-ताम्हिणी घाट-किल्ले रायगड (परतीचा मार्ग तसाच) या मार्गे दररोज तळेगावातून सकाळी सहा वाजता सुटून रायगड पायथा येथे साडेनऊला पोचेल तसेच परतीच्या वेळी ती संध्याकाळी सहा वाजता सुटून अंदाजे नऊ वाजता पोचेल. या प्रमाणे चालू करावी, अशी सूचनाही केली आहे. या सेवेमुळे एका दिवसात किल्ले रायगडाचे व्यवस्थित दर्शन होऊ शकेल. ही गाडी पाली मार्गे गेल्यास गणेश भक्तांना पाली येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शनही करता येईल. किल्ले सरसगड, सुधागड या ठिकाणीही भेट देता येईल. या सेवेचा मार्गात येणाऱ्या गावांनाही फायदा होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02649 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..