‘शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शेतकऱ्यांनी ई-केवायसी 
प्रमाणीकरण करून घ्यावे’
‘शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे’

‘शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे’

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ३ : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वी ३१ ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून आता ७ सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. न केल्यास या योजनेअंतर्गत मिळणारे मानधन बंद होणार आहे. जे शेतकरी ई-केवायसी करतील अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार बर्गे व नायब तहसीलदार चाटे यांनी केले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ९८ हजार २७८ शेतकऱ्यांपैकी आत्तापर्यंत ३ लाख ३८ हजार ४१५ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित १ लाख ५९ हजार ८६३ लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित असल्याची माहिती तहसीलदार बर्गे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02664 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..