वडगावात सजावटीवर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावात सजावटीवर भर
वडगावात सजावटीवर भर

वडगावात सजावटीवर भर

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. ४ : वडगाव शहरात लहान-मोठी सुमारे पंचवीस ते तीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, यावर्षी बहुतेक मंडळांनी देखावे टाळून सजावटीवर भर दिला आहे. अनेक मंडळांनी विविध सामाजिक उपक्रमही राबविले आहेत.
येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात देवस्थान ट्रस्ट व उत्सव समितीने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून हे ७० वे वर्ष आहे. नेत्र तपासणी, रक्तदान, वसतिगृहाला धान्य वाटप, सजावट स्पर्धा आदी उपक्रम घेतले आहेत. संतोष खैरे उत्सव समितीचे अध्यक्ष आहे.
श्री पोटोबा मंदिराच्या प्रांगणात जय बजरंग तालीम मंडळाने श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळाचे हे ७३ वे वर्ष आहे. राजगडाच्या थीमवर सजावट केली आहे. स्व. पै.केशवराव ढोरे संस्थापक असून, नंदकुमार ढोरे यंदाचे अध्यक्ष आहेत.
चांदणी चौकातील साईनाथ मित्र मंडळाचे हे ४९ वे वर्ष आहे. देखावा टाळून महिलांवरील अत्याचारांबाबत जनजागृती केली आहे. वसतिगृहाला मदत केली आहे. शेखर दौंडे अध्यक्ष आहेत. कुंभारवाडा येथील गणेश तरुण मंडळाचे हे ५४ वे वर्ष असून, सजावट केली आहे. माजी उपसभापती गणेश ढोरे संस्थापक असून, सुनील चांदेकर यंदाचे अध्यक्ष आहेत. ढोरेवाडा येथील सिद्धी विनायक मित्र मंडळाचे हे ३७ वे वर्ष असून आकर्षक सजावट केली आहे. सागर तुमकर अध्यक्ष आहेत. मोरया मित्र मंडळाचे हे ३० वे वर्ष असून सजावट केली आहे. रवींद्र बोठे अध्यक्ष आहेत.
मधुबन कॉलनीतील श्रीराम मित्र मंडळाचे हे ४२ वे वर्ष असून सजावट केली आहे. विकी भोसले अध्यक्ष आहेत. शिवाजी चौकातील जय जवान जय किसान मित्र मंडळाचे हे ४९ वे वर्ष असून आकर्षक सजावट केली आहे. संकेत रौंधळ अध्यक्ष आहेत. कुडेवाडा येथील कानिफनाथ मित्र मंडळाचे हे ४४ वे वर्ष असून, यंदा आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. संदीप कुडे अध्यक्ष आहेत. पाटीलवाडा येथील अष्ट विनायक मित्र मंडळाचे हे ४४ वे वर्ष असून, सामाजिक उपक्रम राबवले आहेत. स्वप्नील ढमाले अध्यक्ष आहेत. ढोरेवाडा येथील आदर्श मित्र मंडळाचे हे ४२ वे वर्ष असून, फुलांची आकर्षक सजावट केली आहे. मयूर चांदेकर अध्यक्ष आहेत. चावडी चौकातील जयहिंद मित्र मंडळाचे ४२ वे वर्ष असून, आकर्षक सजावट केली आहे. नितीन चव्हाण अध्यक्ष आहेत. खंडोबा चौकातील जय मल्हार ग्रुपचे हे १३ वे वर्ष असून, इंद्रप्रस्थ सिंहासन हा देखावा सादर केला आहे. आरोग्य शिबिर, धान्य वाटप उपक्रम घेतले आहेत. आफताब सय्यद अध्यक्ष आहेत. पंचमुखी मारुती मित्र मंडळाचे हे २६ वे वर्ष असून, आकर्षक सजावट केली आहे. श्रेयस जाधव अध्यक्ष आहेत. बवरेवाडा येथील बाल विकास मित्र मंडळाचे हे ४८ वे वर्ष असून, दंत तपासणी, अस्थिरोग तपासणी, धनुर्वात लसीकरण, मुलांसाठी विविध स्पर्धा आदी सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. अतुल राऊत अध्यक्ष आहेत. म्हाळसकर वाडा येथील नवचैतन्य तरुण मंडळाचे हे ४८ वे वर्ष असून, ऐतिहासिक थीमवर सजावट केली आहे. धान्य वाटप, वृक्षारोपण आदी उपक्रम घेतले आहेत. भास्करराव म्हाळसकर संस्थापक तर सागर म्हाळसकर यंदाचे अध्यक्ष आहेत. टेल्को कॉलनीतील योगेश्वर प्रतिष्ठानचे हे ३२ वे वर्ष असून, आकर्षक सजावट केली आहे. प्रवीण पवार अध्यक्ष आहेत. बाजारपेठेतील ओंकार मित्र मंडळाचे हे ३८ वे वर्ष आहे. सोमनाथ धोंगडे अध्यक्ष आहेत. क्रांती मित्र मंडळाचे हे ५१ वे वर्ष असून, अक्षय बेल्हेकर अध्यक्ष आहेत. इंद्रायणीनगर मधील इंद्रायणी मित्र मंडळाचे हे ३७ वे वर्ष असून, सजावट केली आहे. रोहन काकरे अध्यक्ष आहेत. माळीनगर येथील माळीनगर मित्र मंडळाचे हे ३१ वे वर्ष असून आकर्षक एलईडी लायटिंग केली आहे. विविध स्पर्धा घेतल्या आहेत. अतुल म्हाळसकर अध्यक्ष आहेत. दिग्विजय मित्र मंडळाचे हे २४ वे वर्ष असून विठ्ठल दर्शन देखावा केला आहे. ओंकार घारे अध्यक्ष आहेत. शिवशंभो मित्र मंडळाचे हे २५ वे वर्ष असून फुग्यांची आकर्षक सजावट केली आहे. सदानंद सातकर अध्यक्ष आहेत. विजयनगर मित्र मंडळाचे हे ३६ वे वर्ष असून आकर्षक सजावट केली आहे. विविध स्पर्धाही घेतल्या आहेत. विजय पटेल अध्यक्ष आहेत. पंचशील मित्र मंडळाचे हे ३८ वे वर्ष असून गणेश हिंगे अध्यक्ष आहेत. याशिवाय वक्रतुंड मित्र मंडळ, महालक्ष्मी मित्र मंडळ, शितळादेवी मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ, झोटिंगबाबा मित्र मंडळ आदी मंडळांनीही सजावटीवर भर देऊन सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

( छायाचित्रे पाठवत आहे )

Web Title: Todays Latest Marathi News Vdm22b02669 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..